" GOOD PERSONALITY" ( हसतमुख चेहरा, चांगले कपडे (सहसा शर्ट इन केलेला ) पायात Shoes घाण वास न येणारे Socks, चांगले हस्ताक्षर, चपळ वृत्ती, शारीरिक तंदुरूस्ती, महत्वाचे निर्व्यसनी..
" GOOD COMMUNICATION SKILL " (सफाईदार English बोलणे, बोलताना डोळ्यात बघुनच सर्वाकडे बघत बोलणे, Internet ची अद्यावत माहिती व उपयोग. )
"USE OF BODY LANGUAGE " ( पाठीला बाक न आणता बसणे, बोलताना स्पष्ट हातवारे करत बोलणे, बोलताना हर्षोफुल्लत उच्चार करणे, समोरच्या माणसाला प्रतिप्रश्न करत संभाषणात सहभागी करणे, Board/Pen/Pencil चा वापर करणे.
"RESPONSIBILITY (अंगावर काम ओढून घेणे, काम हे काम न समजता कामात झोकून देऊन आनंदात (Enjoy समजून) काम करणे, एक काम सांगितले तर चार कामे स्वतःहून आनंदाने करणे.)
"OWNERSHIP " (स्वतःचे घरचे काम समजून करणे, कंपनी आपले देवालय मानणे, मशिन्स, चकाचक स्वच्छ फडक्याने साफ ठेवणे (5S, ISO, TPM Systems)
“Extra hour working " (दिलेले काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जावू नये अर्थात ते काम अपूर्ण राहील्यास परत कंपनीत जाण्याचा त्रास होऊ नये. ( कंपनीने कामावरून काढून टाकले असे समजावे.) कमीत कमी एकाच कंपनीत ३ ते ५ वर्षे सलग काम करणे म्हणजे अनुभव चांगला येईल व आपण Expert होऊ. (Machines ची Manuals वाचून त्याचा उपयोग प्रत्यक्ष मशीन वर करावा.) प्रत्येक वापरणाऱ्या वस्तू ( Machine Instruments, parts वै, वे ) ला what ? Why? How? चे प्रश्न विचारून माहीत करून घेणे.
हात काळे करणे: Machines ची किंमत कोटीमध्ये असल्याने पहिले ३ ते ६ महीने मशिनची माहिती “Zero level Ground level (Helper / Operator)" समजून करणे. " FIRST MISTAKE LAST MISTAKE" समजावे.कारण मशिन जर धडकले किंवा Damage झाले तर त्याचा खर्च लाखात असतो तो कंपनीला परवडणारा नसतो व उत्पादन थांबते. यासाठी तेथील तज्ञ व्यक्तीकडून (Operator) माहिती घेणे मशिनवर काम केलेल्या अनुभव ऑपरेटरलाच गुरू करावे. कारण तोच जास्ती माहिती देईल. जेवढे हात काळे कराल तेवढे भविष्य Bright होईल हे समजावे."
आपण Fresh / शिकावू असल्याने पगाराची अपेक्षा ठेवू नये. कंपनीची जेवढी जास्त कामाची जबाबदारी घ्याल तेवढ्या पर्यंत पगार नंतर (2 ते 3 वर्षे सलग काम केल्यावर ) 2 ते 5 Lacs वार्षिक चे Package मिळू शकते. (B.E / DIP ENGG CERTIFICATES GATE PASS समजावीत. )
“Long Term Working" कंपनी तुम्हाला सर्व शिकवणार असल्याने कमीत कमी 1 ते 2 वर्षे स्वतःहून BOND देण्याची तयारठेवावी. नोकरी सोडताना कालावधी 1 ते 3 महिन्याची आगाऊ Notice द्यावी लागेल.
“Continuous up-gradation"रोज रोज नवीन शिकण्याची तयारी ठेवावी. यासाठी रोज 2 तास जादा थांबावे. समजले नसेल तर सतत प्रश्न विचारावेत. BOND देण्याची तयार ठेवावी. (FAQ Frequently ASKED Questions.) (२०० पानी वहीमध्ये नोंद करावी.)
"Suggestion"( खर्च कपात ) कंपनीचा फायदा तोटा याचा सतत विचार करावा. यासी तज्ञ व्यक्ती Internet/Exhibition ला भेटी देऊन खर्च कपातीसाठी Cost Reduction यामध्ये उत्पादन कसे वाढेल, Rejection कसे कमी होईल, मशिनचे आयुष्य कसे वाढेल वगैरे वगैरे साठी Suggestion (भले चुकीच्या) असतील त्या आठवड्याला एक देणे KIEZEN (कायझन) यालाच म्हणतात. यांनाच कंपनी कायम करते थे कंपनी अत्याधुनिक ट्रेनिंगला परदेशी पाठवते. कंपनीला दिवस भरणारी लोक नको असतात.
“Loyality/Honesty"चोरी/खोटे नाटेReportsदेऊ नयेत राजकारण वगैरे वशिलेबाजी करू नये.
काम येत नसेल तर स्वतःच्या हाताने काम करून सतत शिकण्याची तयारी ठेवावी. महत्वाचे :- जगातील सर्व नावली माणसांनी (आयुष्यात चट/उतार नफातोटा, चांगले वाईट अनुभव आपली ओळख निर्माण केलेली आहे. उदा. मा. अब्दुल कलाम, अंबानी, बिल गेट्स,मेनन यांचा . . .. आदर्श समोर ठेवून स्वतःची समाजात ओळख निर्माण करावी,
मुलाखतीस ( Interview) जाताना पुढील प्रमाणे तयारी करावी.
“Appointinent" च्या दिलेल्या वेळेच्या पूर्वी अर्धा तास कंपनीमध्ये हजर रहावे.
स्वच्छ इस्त्री केलेले पांढरे सभ्य दिसतील असे कपडे घालावेत.
पायात पॉलीश केलेले बूट,तसेच घान वास न येणारे सॉक्स घालावेत.शर्टाची सर्व बटणे घालावित(Tieघातल्यास उत्तम.)
मोबाईल बंद करून किंवा महत्वाचा फोन येणार असल्यास Silent वर ठेवावा.
मुलाखतीस जाणेपूर्वी २ दिवस आधी तयारी (कागदाचा) लिहून करावी यामध्ये अ) स्वतः बद्दलची माहिती त्यामध्ये आपली Family Background, शैक्षणिक माहिती (जी आपण आतापर्यंत केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल किंवा वाईट गोष्टींबद्दल जी आपणास चांगले होण्यास मदत झाली आहे. दोन मिनीटात (Achievements, Awards / Social work चा उल्लेख आवर्जून करावा. ) ब)पूर्वीच्या अनुभवाची पूर्ण माहिती ज्यामध्ये आपण स्वतः कंपनीसाठी काय करून दाखविलेले आहे. ( उदा. खर्च कपात 15O Implementation system applied Engg. Basic Calculation, Block Diagram, Working Principal etc उत्तरे positive approach नेच याची उत्तरे माहित नसल्यास माहित नाही परंतु माहित करून घेण्याची इच्छा आहे असे सांगावे खोटा पगार सांगू नये कंपनीच्या नियमानुसार पगार मागावा.
Interview room मध्ये विचारल्याशिवाय आत जावू नये. तसेच बसा म्हटल्याशिवाय बसु नये. बसल्यावर Good morning Sir वगरे म्हणावे.
English मध्ये बोलण्याचा प्रयत्न असावा. श्वसोत्सव दीर्घ करावा म्हणजे भीती कमी होईल.
प्रश्न समजला नसल्यास Sorry असा शब्द वापरावा. उलट प्रश्न विचारू नये.
बोलताना थांबत थांबत प्रत्येक वाक्याला बोलावे, म्हणजे समोरच्या माणसाला आपले बोलणे मुद्देसुदपणे कळेल असे बघून बोलावे. तसेच उत्तरे देताना कागदाचा तसेच गोष्टीचा उल्लेख करून बोलावे. कंपनीमध्ये पाहुण्यांचा/मित्रांच उल्लेख करावा. (वशिला लावू नये).
कंपनीच्या जवळपास रहाणेची सोय आहे असे सांगावे.
प्रश्न नीट समजल्याशिवाय उत्तरे देऊ नयेत तसेच प्रश्न विचारल्यावर थोडा विचार करून उत्तर द्यावे.
निवड झाली नसल्यास स्वतःचे मानसिक संतुलन बिघडवता दिलेल्या कंपनीपेक्षा चांगल्या कंपनीमध्ये आपल्याल संधी मिळेल यावर परमेश्वरास स्मरून विश्वास ठेवावा.